गुंतवणूकदार म्हणून आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. किती रक्कम शेअर्समध्ये गुंतवावी? कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी? कोणते शेअर्स धरून ठेवावेत आणि कोणते विकावेत? आपल्या पोर्टफोलियोचे संरक्षण करण्यासाठी कधी डेरिव्हेटिव्ह्सचा वापर करावा? अशा अनेक प्रश्नांनी गुंतवणूकदार गोंधळून जातात. याशिवाय, बाजारातील अस्थिरता आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊन बसते. यामुळेच अनेक वेळा गुंतवणूकदार चुकीचे निर्णय घेतात आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
आपल्यापैकी अनेकांनी कधीतरी आर्थिक नुकसान सहन केले असेल, विशेषतः जेव्हा आपण आपल्या गुंतवणुकीचे नियंत्रण दुसऱ्यांच्या हाती सोपवतो आणि त्यांच्याकडून निश्चित परतावा मिळण्याची आशा करतो. अशा अनेक तक्रारी घेऊन गुंतवणूकदार मला भेटतात. त्यांना त्यांच्या नुकसानाची भरपाई अपेक्षित असते. बहुतांशी जणांना त्यात यश येत नाही. मात्र इथून पुढच्या गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन मात्र द्यायचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो.
याच अनुभवांच्या पार्श्वभूमीवर, गेली तीन वर्षे प्रतिभूती बाजारातील सल्लागार म्हणून आम्ही काम करत आहोत. बाजारातील अस्थिरतेतून मार्ग काढण्यासाठी, योग्य वेळेला प्रवेश आणि बाहेर पडणे अत्यावश्यक असते. डेरिव्हेटिव्ह्स आणि डे-ट्रेडिंग हे सर्वांसाठी योग्य असत नाही. प्रत्येक गुंतवणूकदाराची जोखमीची क्षमता आणि परताव्याची गरज वेगळी असते, आणि त्यानुसारच सल्ला मिळणे महत्त्वाचे.
Trade Encore या नावाने आम्ही सेबी (SEBI) नोंदणीकृत संशोधन विश्लेषक आहोत, नोंदणी क्रमांक INH000009269. आम्ही भारतीय शेअर बाजारातल्या आपल्या प्रवासातील विश्वसनीय साथीदार आहोत. वित्तीय जगातील संधींचा फायदा अनेक गुंतवणूकदारांना आम्ही करून दिला आहे. आम्ही स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, फ्युचर्स आणि ऑप्शन्सवरील सल्ले देतो.
आपल्यापैकी कुणाला गुंतवणूक सुरु करायची असल्यास किंवा असलेल्या गुंतवणुकीबद्दल तज्ञ सल्ला हवा असल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधा.
आजच सदस्य व्हा:
Check our Social media handles for regular updates:
Facebook: https://www.facebook.com/tradeencore/
Instagram: https://www.instagram.com/tradeencore/
Linkedin: https://www.linkedin.com/company/tradeencore/
Twitter: https://twitter.com/tradeencore
Youtube: https://youtube.com/@tradeencore
Location: https://goo.gl/maps/rvjHEicGBYt6mgNV8
Disclaimer:
ट्रेड एनकोर हा सेबी नोंदणीकृत संशोधन विश्लेषक आहे, नोंदणी क्रमांक INH000009269. सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक/व्यवहार बाजार जोखमीच्या अधीन आहे, भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी असत नाही. इक्विटीज, डेरिव्हेटिव्हज, कमोडिटीज आणि चलन यांसारख्या सिक्युरिटीज मार्केटमधील व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याचा धोका महत्त्वपूर्ण असू शकतो. ट्रेड एनकोर त्याच्या कोणत्याही सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा परताव्याची हमी देत नाही. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत ट्रेड एनकोर नुकसानासाठी जबाबदार नाही.